Ads

-

लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम !

By Xtralarge News

February 22, 2022 8:08 pm

Ads

लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम !

मुंबई, दि.२२ फेब्रुवारी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ आणि ८ जानेवारी व ९ जानेवारी व ३१ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अदयाप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी १५ जुलै, १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेले निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र ८ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर २०२१, ८ जानेवारी व ९ जानेवारी तसेच ३१ जानेवारी २०२२ या तारखांना निर्गमित केलेले आदेश अदयाप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालने, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिंबधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment