Ads

--

संजय राऊतांपेक्षा भयानक मी बोलू शकतो पण …!

By Xtralarge News

February 22, 2022 11:34 am

Ads

संजय राऊतांपेक्षा भयानक मी बोलू शकतो पण …!

मुंबई, २२ फेब्रुवारी :
मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करत समोरच्याला कोणती भाषा कळते, त्याच भाषेत आपण बोलतो, असे वक्तव्य केले होते त्यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांनी अससे उत्तर दिले.

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. त्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच.

No comments to show.

Leave a Comment