Ads

-

छत्रपती शिवरायांना वहीपेनाची मानवंदना

By Xtralarge News

February 18, 2022 9:40 pm

Ads

छत्रपती शिवरायांना वहीपेनाची मानवंदना

रायगड, दि. १८ फेब्रुवारी:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी शिवाजी महाराजांना वही आणि पेनांची मानवंदना दिली.एक वही एक पेन अभियानाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून शिवप्रेमींसह सर्वांनी यात सहभागी झाले पाहीजे असे उद्गार त्यांनी काढले.
समाजातील आर्थिक दुर्बल घटक आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून देशातील महापुरूषांच्या जयंती दिनी स्मृतिदिनी तषेच गणेशोत्सवात हारफुलांऐवजी वहीपेनांची मानवंदना हा उपक्रम एक वही एक पेन अभियानच्या वतीने राज्यभरात चालविला जातो . विविध सामाजिक राजकीय संस्था संघटना यात उत्स्फूर्तपणे नोंदवून स्थानिक पातळीवर हा उपक्रम राबवितात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने किल्ले रायगडावर अभ्यास दौ-याचे आयोजन केले होते.
रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी प्राधिकरणच्या विविध कामकाजाची माहीती यावेळी दिली. सदर प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनधिष्ठित पुतळ्याला छत्रपती संभाजी राजे व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात एक वही एक पेनाची मानवंदना देण्यात आली.
समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्यच आहे. शिवप्रेमींसह सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी राजे यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment