Ads

--

समीर वानखेडेंना दिलासा…नवाब मलिकांचा मात्र दणका !

By Xtralarge News

February 12, 2022 1:23 pm

Ads

समीर वानखेडेंना दिलासा…नवाब मलिकांचा मात्र दणका !

नवी दिल्ली, दि. १२ फेब्रुवारी:

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडे अनुसूचित जातीचे आहेत असे आयगाने स्पष्ट केले  आहे. आयोगाने वानखेडेंच्या तक्रारीनुसार नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. वानखेडेंच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११,४९९,५०३,५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती परंतु आयोगाने ही एसआयटी बरखास्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अनुसूचित जाती आरक्षणांतर्गत आयआरएस नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

No comments to show.

Leave a Comment