Ads

-

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत होणार

By Xtralarge News

February 9, 2022 8:21 pm

Ads

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत होणार:

पुणे, दि. 9 फेब्रुवारी:
भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी निधी दिला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जागेत होणार आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन एकर जागा देणार असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सांगितले आहे.

No comments to show.

Leave a Comment