Ads

-

टिपू सुलतानविषयी राष्ट्रपती भवनसमोर ठिय्या आंदोलन करा

By Xtralarge News

January 27, 2022 4:31 pm

Ads

टिपू सुलतानविषयी राष्ट्रपती भवनसमोर ठिय्या आंदोलन करा..

मुंबई, दि. २७ जानेवारी :

मी टिपू सुलतान यांच्याविषयी चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा…राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करा, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

नवाब मलिक म्हणाले, ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे…वातावरण दुषित केले जात त्यावरुन टीपू सुलतान यांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदियुरप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला.

राष्ट्रपती कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही असे भाषण केले होते याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली.

टिपू सुलतान इंग्रजासमोर शरण गेला नाही. जी व्यक्ती इंग्रजासमोर झुकली नाही त्यांच्या नावावर वाद उभा केला जात आहे हे राजकारण असून प्रविण दरेकर हे मजुर सोसायटीचे कामकाज नाही. इतिहास समजना आप के बस की बात नही, असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

No comments to show.

Leave a Comment