Ads

--

भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा !

By Xtralarge News

January 24, 2022 10:06 am

Ads

भिवंडीला पुन्हा काँग्रेसचा गड बनवा !

मुंबई, दि. 24 जानेवारी :
भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे पण काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे आपली पीछेहाट झाली होती. पण आता काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भिवंडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. केंद्रातील सरकारने जनतेची फसवणूक केली असून मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे छोटे उद्योग बंद झाले आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे आता लोकांच्या लक्षात आले आहे त्यामुळे विविध पक्षातून काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे.

नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. भिवंडीतील इतर पक्षातील अनेक नेते आपल्या संपर्कात असून तेही लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. भिवंडीचे खासदार, दोन्ही आमदार काँग्रेसचे असतील आणि महापालिकेत स्वबळावर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी गट तट सोडून एकत्रितपणे कामाला लागा असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment