Ads

---

आदित्य ठाकरेंच्या समर्थनसाठी युवा नेते मैदानात!

By Xtralarge News

August 5, 2020 12:14 am

Ads

काही अतृप्त आत्मे सोडले तर आदित्य ठाकरेंवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपला चिमटा.

मुंबई :- 5 ऑगस्ट

आदित्यजींना मी गेल्या काही दिवसांपासून ओळखतो. ते अत्यंत नम्र, प्रामाणिक व पाय जमिनीवर असलेले व धोरणी राजकारणी आहेत. वस्तुस्थिती लक्षात न घेता एखाद्यावर आरोप करणं खूप सोपी गोष्ट आहे. आदित्यजी, काही अतृप्त आत्मे सोडले, तर या राज्यातल्या जनतेला आपल्या चांगुलपणावर विश्वास आहे असे म्हणत राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला चिमटा काढला आहे तर मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत सुशांतसिंग राजपूत प्रकरणात उडी घेतली आहे. सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राणे यांनी या प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतले आहे.

आदित्य ठाकरे यांनी संध्याकाळी एक पत्र प्रसिद्ध करत भाजपच्या राजकारणाचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मागे संपूर्ण महाविकास आघाडी आता उभी ठाकली आहे. महाविकास आघाडी सर्व तरुण आमदार, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ज्यात राज्यमंत्री तनपुरे यांनीही सहभाग घेतला.

No comments to show.

Leave a Comment