Ads

--

MLC निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार!

By Xtralarge News

December 14, 2021 1:37 pm

Ads

MLC निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार!

मुंबई दि. १४ डिसेंबर:

अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक म्हणाले की, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे. राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे.

राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्र सरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे करु असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment