Ads

--

आपला योध्दा लढाईत नक्की जिंकेल !

By Xtralarge News

December 12, 2021 6:38 pm

Ads

आपला योध्दा लढाईत नक्की जिंकेल !

मुंबई, दि.12 डिसेंबर:
देशात वैचारिक लढाई उभारण्याची गरज असून आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात पवारांच्या नेतृत्वाखाली जर सरकार बनत असेल तर देशातही पवारांच्या विचारांचे सरकार निर्माण होईल. पवार यांच्यामुळे माझी ओळख देशात आणि राज्यात निर्माण झाली असल्याची प्रामाणिक कबुलीही नवाब मलिक यांनी दिली.

पवार आपल्याला एक संघर्ष तयार करायला हवा. देशातील जनता आपल्याकडे आशेने बघत आहेत.
महाराष्ट्रात समतामुलक समाज निर्माण व्हावा या विचाराचे पवार आहेत. तुम्ही योध्दा आहात तुम्हीच हे चक्रव्यूह भेदू शकता असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment