Ads

--

पराभव दिसू लागल्यानेच चंद्रशेखर बावनकुळे बावचळले !

By Xtralarge News

December 12, 2021 3:18 pm

Ads

पराभव दिसू लागल्यानेच चंद्रशेखर बावनकुळे बावचळले !

नागपूर, दि. १२ डिसेंबर:

भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळेंना नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने ते बावचळले आहेत. यातूनच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागण्याएवढी आपली उंची नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

बावनकुळे यांचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, निवडणुकीत उमेदवार बदलणे हा राजकीय डावपेचाचा एक भाग असतो हे समजण्याएवढे बावनकुळे यांचे डोकेही ठिकाणावर नाही. निवडणुकीत घोडेबाजार करण्यासाठीच भाजपाने तुम्हाला उमेदवारी दिली आहे अन्यथा तीही मिळाली नसती. जेंव्हा संदीप जोशी यांचा पराभव झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा बावनकुळे यांनी मागायला हवा होता ते जास्त संयुक्तिक ठरले असते परंतु आपला पराभव दिसत असल्याने आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात.

No comments to show.

Leave a Comment