Ads

--

महापौरांबद्दल मी ‘तसे’ बोललोच नाही !

By Xtralarge News

December 7, 2021 5:44 pm

Ads

महापौरांबद्दल मी ‘तसे’ बोललोच नाही !
मुंबई, दि. 7 डिसेंबर:
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा मुद्दा तापला आहे. महिला आघाड्यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परंतु मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही असा खुलासा आ. आशिष शेलार यांनी केला आहे.

शेलार पुढे म्हणाले की, ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौर महोदयांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल.माझी महापौरांना विनंती आहे की, मी जे बोललोच नाही, तेच तुमचे समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे, असेही आमदार आशिष शेलार म्हणाले..

No comments to show.

Leave a Comment