Ads

--

ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्राच्या दारावर !

By Xtralarge News

December 2, 2021 6:40 pm

Ads

ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्राच्या दारावर !

मुंबई, दि. २ डिसेंबर :

कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्व व्यवहार सुरुळीत सुरु झाल्याचे चित्र असतानाच दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन या विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. या विषाणुचे दोन रुग्ण कर्नाटक सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन हातपाय पसरायला लागल्याचे दिसत आहे. कर्नाटकमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे दोन्ही रुग्ण हे परदेशी नागरिक असल्याची माहिती आहे. या दोघांचे वय ६६ वर्षे आणि ४६ वर्षे असे आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांची चाचणी करण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. परंतु ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असले तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दक्षिण अफ्रिकेतून जवळपास एक हजारजण महाराष्ट्रात आल्याचे समजते, त्यात डोंबिवलीतील एकजण आहे. ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी घाबरण्याच कारण नाही, कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment