Ads

-

जितेंद्र व एकताने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By Xtralarge News

November 10, 2021 5:23 pm

Ads

जितेंद्र व एकताने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन.

मुंबई, दि. 10 नोव्हेंबर:

हिंदी चित्रपटसृष्टीतले जेष्ठ अभिनेते जितेंद्र व त्यांची मुलगी प्रसिद्ध निर्माती एकता कपूर यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने एकता कपूर यांना गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारानंतर त्यांनी वडील जितेंद्र यांच्यासह श्री.सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले…

यावेळी श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा विश्वस्त या नात्याने राजाराम देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अहमदनगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार पोटे, वडाळा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रसन्न रणदिवे, माहीम विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सिद्धेश मयेकर, वडाळा विधानसभा युवक वॉर्ड अध्यक्ष कल्पेश कुडतरकर आणि सागर पाटील उपस्थित होते.

 

No comments to show.

Leave a Comment