Ads

--

आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाईंड वानखेडेचा मित्र मोहित कंभोज

By Xtralarge News

November 7, 2021 8:41 pm

Ads

आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाईंड वानखेडेचा मित्र मोहित कंभोज.

मुंबई दि. ७ नोव्हेंबर :
आर्यन खानचे अपहरण करण्यात आले. मोहित कंभोज याच्या मेहुण्याकडून ट्रॅप लावून आर्यनला यामध्ये अडकवण्याचा डाव झाला त्यानंतर २५ कोटीची मागणी करण्यात आली. ही डील १८ कोटीमध्ये झाली. त्यातील ५० लाख उचलण्यात आले. मात्र एका सेल्फीमुळे हा खेळ बिघडला. या अपहरणाचा मास्टर माईंड मोहित कंभोज असून कंभोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत असा आणखी एक सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

मोहित कंभोज आणि समीर वानखेडे यांच्यातील मीटिंगचे व्हिडिओ आम्ही समोर आणणार होतो पण त्यांचे नशीब चांगले की सीसीटिव्ही फुटेज बंद असल्याने ते मिळाले नाहीत. मागील एक महिन्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी मी आपल्याला काही माहिती दिली होती. २ ऑक्टोबरला कार्डीलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करून त्यात आर्यन खानसोबत ८ लोकांना अटक करण्यात आले. हा सर्व प्रकार फर्जीवाडा असल्याचे आम्ही स्पष्ट केले होते. त्यावर मलिक असे प्रश्न का उपस्थित करतात अशी टीका करण्यात आली. यामध्ये माझ्या जावयाला अटक करण्यात आल्यामुळे बोलले जात आहे असा आरोपही करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये ३ लोकांना सोडण्यात आले. या तीन लोकांमध्येच मोठा खेळ झाला आहे.

समीर दाऊद वानखेडे यांचा एकच धंदा आहे तो म्हणजे श्रीमंत लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करायचे. यामध्ये प्रभाकर साहिल यांनी माझ्या सांगण्यावरून आरोप केले आहेत असे सांगण्यात येते. मात्र मी सांगितल्याप्रमाणे हॉटेल ‘द ललित’ मे छुपे है कूछ राज’ यावर पगारे यांनी मला भेटून त्यातील अनेक गोष्टी उघड केल्या. यामध्ये समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून कशाप्रकारे हॉटेल ललितमध्ये गैरव्यवहार सुरू होता हे समोर आले. त्यांचा एकच धंदा आहे कशा प्रकारे पैसा उकळता येईल. ड्रग्ज माफियांना संरक्षण कसे दिले जाईल. याबद्दल काल प्रायव्हेट आर्मीची प्रेस झाली. यामध्ये सांगण्यात येते की, नवाब मलिक यांनी प्लॅन करून हे घडवलं आहे. या सर्व प्रकरणात सुनील पाटील हा व्यक्ती प्रायव्हेट आर्मीचा पार्ट असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment