Ads

-

लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा

By Xtralarge News

November 4, 2021 4:18 pm

Ads

लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा..

मुंबई दि. ४ नोव्हेंबर :
भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार आणि केंद्राची ही सततची लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला यामुळे केंद्राकडून मोठ्याप्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे.

जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाल्याचे नवाब मलिक म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment