Ads

-

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करु

By Xtralarge News

November 3, 2021 9:09 pm

Ads

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करु

मुंबई, दि. 3 नोव्हेंबर :
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू , असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी दरेकरांना सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शासनाचे व परिवहन मंत्री महोदय यांचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कोणतीही कारवाई करु नका अशी विनंती देखील दरेकर यांनी परिवहन मंत्र्यांना केली. या बाबतीत बोलताना मंत्री परब म्हणाले की, आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही तसेच तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्व सामान्य जनतेची गैरसोय टाळावी असे आवाहन त्यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment