Ads

---

सोरेगावच्या नागेश डान्सबारवर सोलापूर पोलिसांचा छापा

By Xtralarge News

October 30, 2021 11:34 pm

Ads

सोरेगावच्या नागेश डान्सबारवर सोलापूर पोलिसांचा छापा…

सोलापूर, दि. ३० ऑक्टोबर:
डान्सबारचे लोण आता मुंबई, ठाण्यापुरते मर्यादित राहिले नसून हे लोण आता सोलापुरसारख्या शहरातही पसरले आहे. कोविडमधून नागरिकांची सुटका झालेली नसतानाही सोलापुरातजवळील सोरेगावात डान्सबार सुरु होता. सोलापूर पोलिसांना माहिती मिळताच सोरेगाव येथील नागेश डान्सबारवर छापा मारून १२ बारबालांसह ३० पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १ लाख ११ हजार ९७० रुपयांची रोकड, २५ मोबाईल, २ लॅपटॉप असे ३ लाख ५१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल व चारचाकी वाहने, दुचाकीसह एकूण ४९ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी छापा मारला त्यावेळी नागेश बारमध्ये बारबाला तोकडे कपडे घालून अश्लिल डान्स व बिभत्स वर्तन करत होत्या तसेच शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात कलम १८८, २६८, २६९, २९४, ३४ सह विविध कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांना मिळालेल्या माहितीनंतर नागेश डान्स बारवर छापा मारुन ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांच्यासोबत पोलीस हवालदार दादाराव इंगळे, दीपक चव्हाण, संतोष देशमुख, अण्णाराव म्हेत्रे, सपोनि कोल्हाळ, भोसले, संजय मोरे, पोह-तोळणुरे, घुगे, आतिश पाटील, इम्रान जमादार, रोहन ढावरे, हर्षल खरात यांनी या कारवाईत सहभाग घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment