Ads

-

आर्यन खान २६ दिवसांनंतर जेलमधून बाहेर

By Xtralarge News

October 30, 2021 1:58 pm

Ads

आर्यन खानची २६ दिवसांनंतर जेलमधून बाहेर.

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर:
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची अखेर जामीनावर सुटका झाली असून सकाळी तो आर्थर रोड जेलमधून घरी परतला. क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन व त्याच्या मित्रांना एनसीबीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपये जातमुलचक्यासह १४ अटी घालून त्याला जामीन मंजूर केला.

पोलिसांना कळवल्याशिवाय आर्यन खानला मुंबई सोडता येणार नाही, दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजरी लावणे, पासपोर्ट जमा करणे तसेच अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपीमित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे. यातील कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्यास एनसीबीला जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल.

शाहरुख खानची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला हिने आर्यनसाठी जामीन दिला. आर्यनच्या सुटकेनंतर मन्नतबाहेर जल्लोष करण्यात आला. शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली होती. मन्नतला रोषणाई करण्यात आली असून चार दिवस आधीच शाहरुखच्या घरी दिवाळी पहायला मिळाली.

 

No comments to show.

Leave a Comment