Ads

-

प्रकरण गंभीर ; बऱ्याच लोकांचा हात असू शकतो !

By Xtralarge News

October 24, 2021 7:03 pm

Ads

प्रकरण गंभीर ; बऱ्याच लोकांचा हात असू शकतो !

मुंबई दि. २४ ऑक्टोबर
आर्यन खान प्रकरणी आज मोठा गौप्यस्फोट समोर आल्याने राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

जयंत पाटील म्हणाले की, बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागली आहे. भाजपचे केंद्र सरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे.

एनसीबीच्या रेड प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईल याने या प्रकरणात 25 कोटीची डील झाल्याचा खळबळजनक दावा केल्याची बातमी आली त्यावर पाटील यांनी प्रतिक्रीया दिली.

No comments to show.

Leave a Comment