सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते !
आयकार विभागाच्या छाप्यावरुन राजकारण तापले
सोलापूर, दि. ८ ऑक्टोबर :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपनी व बहिणींच्या घरावर दोन दिनसापासून आयकर विभागाचे छापे टाकले जात आहेत. आयकर विभागाच्या या छापेमारीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आयकर विभागाच्या छापेमारीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला.
सोलापूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले की, मला कळलं की अजित पवारांकडे सरकारने काल काही पाहुणे पाठवले होते,ते पाहुणे येऊन गेले पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते.”
“तुम्हाला आठवतंय का निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणामध्ये मला ईडीनं नोटीस पाठवली होती. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं नाही आणि असं असतानाही मला ईडीची नोटीस दिली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला वेडी ठरवलं. त्यामुळे आज अजित पवारांच्या बद्दल किंवा इतर काहींच्या बाबतीत काही गोष्टी जर त्यांनी केल्या असतील, तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या संतापातून दिसून येईल. सत्तेचा गैरवापर राज्यकर्ते कसा करतात याबाबत निश्चित लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत”. असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांचे काही साखर कारखाने, कंपन्या, त्यांचा मुलगा पार्थच्या कार्यालयावर तसेच तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. बहिणींच्या घरावर छापे मारल्यावरुन अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Leave a Comment