Ads

-

क्रुझवरील ‘त्या’ ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा ?

By Xtralarge News

October 8, 2021 11:17 am

Ads

क्रुझवरील ‘त्या’ ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा ?

एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांचे गौप्यस्फोट

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर :
क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना पकडले होते मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले असून जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा होता. हा कोणाचा मेव्हणे होता याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना ८ ते १० लोकांना पकडले आहे असे मिडिया बाईट मध्ये सांगितले होते. त्यावेळी मी प्रश्न विचारले होते एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो , असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळं गॉसिप केले आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा असा सवाल नवाब मलिक यांनी करतानाच NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल असेही नवाब मलिक म्हणाले.

 

परमबीरसिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मापण जनतेचे सेवक होते परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्तीदेखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.

कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या त्यामध्ये २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

 

No comments to show.

Leave a Comment