Ads

---

माजलगावमध्ये ‘मी पुन्हा येईन’ !

By Xtralarge News

September 28, 2021 10:04 am

Ads

माजलगावमध्ये ‘मी पुन्हा येईन’ !

माजलगांव दि. 28 सप्टेंबर :

मोठ्या संघर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. हे यश इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आहे…पदाधिकाऱ्यांचे आहे…माजलगावमध्ये विविध प्रकल्प, योजना, विकासकामे करण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. प्रकाशदादांच्या नेतृत्वात माजलगावचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली परिवार संवाद यात्रा आज बीड येथे पोहोचली. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे मतदारसंघात नसल्याने माजलगाव येथील आढावा कालांतराने घेतला जाईल असेही सांगितले.

परिवार संवाद यात्रा माजलगाव येथे पोहोचली असता जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती जयसिंग सोळंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे जंगी स्वागत केले.

आपले आमदार मतदारसंघात नाही म्हणून इथल्या संघटनेचा आढावा घेण्यासाठी मी पुन्हा येईन असे आश्वासन त्यांनी दिले.

No comments to show.

Leave a Comment