Ads

-

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा

By Xtralarge News

September 22, 2021 2:20 pm

Ads

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा.

मुंबई, दि. 22 सप्टेंबर:

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशात साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदूचे तथाकथित रक्षक असल्याचे आव आणणारे सरकार राज्यात असतानाही हिंदू साधू संतांच्या हत्या होत आहेत हे अतिशय गंभीर आहे. उत्तर प्रदेशात आता राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपशासीत राज्यांमध्ये साधू संतांच्या हत्या होत आहेत. भाजपाविरोधात बोलणा-या साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. नरेंद्र गिरी यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या अनुयायांनी केला आहे असे नाना पटोले म्हणाले.

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूने देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढील सहा महिन्यात होत असल्याने राजकीय पक्षांनी भाजपावर कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर घेरले आहे.

No comments to show.

Leave a Comment