Ads

-

मुंबई नागपूर बुलेट ट्रेन ही आमची पूर्वीचीच इच्छा !

By Xtralarge News

September 18, 2021 11:09 am

Ads

मुंबई नागपूर बुलेट ट्रेन ही आमची पूर्वीचीच इच्छा !

औरंगाबाद, दि. 18 सप्टेंबर:
अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची चर्चा सुरू होती त्यावेळी आमचं म्हणणं होतं की राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी उपयोगी होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यक्रमात दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गाच्या बाबतीत प्रेझेंटेशन दिले नाही तरी राज्य सरकार या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य करेल. मी काही राजकारण आणू इच्छित नाही. जनहिताच्या कामांत राजकारण आणणार नाही. राजकीय मतभेद असतील तर ते सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजेत.

जिल्हा परिषद इमारत केवळ आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे असे नाही तर सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत १८ महिन्यात ही इमारत पूर्ण झाली पाहिजे या अटींवर आपल्याला बांधकामासाठी जे काही २० कोटी लागतात ते दिले जातील.

लोकांनी कामासाठी या इमारतीत आले पाहिजे पण त्याहून जास्त म्हणजे ही इमारत इतकी चांगली बनवा की जिल्हा परिषदेची इम्रत कशी असते ते नुसते पाहायला लोक आले पाहिजे.

No comments to show.

Leave a Comment