Ads

--

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा

By Xtralarge News

September 1, 2021 11:46 am

Ads

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा

सोलापूर, दि. 1 सप्टेंबर :
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे.

मुलांना संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात 1400 बेडची क्षमता तयार केली आहे. यामध्ये 1200 शासकीय, खासगी आणि सिव्हीलमध्ये 100 साधे, 50 अतिदक्षता बेडची क्षमता तयार ठेवली आहे. जी मुले नियमित लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांचे इंद्रधनुष्यमध्ये पूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment