Ads

--

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका

By Xtralarge News

August 28, 2021 7:02 pm

Ads

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका

मुंबई दि. 28 ऑगस्ट:
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहेत. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत ही आपली भूमिका असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक राज्य सरकार तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. मात्र रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही याबद्दल रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकांना रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण का दिले जात नाही याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवुन जाब विचारणार असल्याचेही आठवले म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment