Ads

--

पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या

By Xtralarge News

August 23, 2021 3:43 pm

Ads

पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या

मुंबई, दि. 23 ऑगस्ट
गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहिदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोना परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत.त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पुर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने आजच्या बैठकीत त्यांना सहभागी होता आले नाही.

No comments to show.

Leave a Comment