Ads

--

महापूरावेळी कर्नाटकने केलेल्या सहकार्याबद्दल आभार

By Xtralarge News

August 6, 2021 10:21 pm

Ads

महापूरावेळी कर्नाटकने केलेल्या सहकार्याबद्दल आभार

मुंबई. दि. ६ ऑगस्ट :
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली व मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.

दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होवू पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment