Ads

-

कुस्तीपटू रविकुमारच्या ऑलिंपिक रौप्य पदकालाही सुवर्ण झळाळी

By Xtralarge News

August 5, 2021 6:43 pm

Ads

कुस्तीपटू रविकुमारच्या ऑलिंपिक रौप्य पदकालाही सुवर्ण झळाळी

ऑलिंपिक रौप्यपदक विजेता रविकुमार दहियाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबई, दि. ५ ऑगस्ट :
टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनीगटात फ्रिस्टाईल कुस्तीचे रौप्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू रविकुमार दहियाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

ऑलिंपिकच्या सर्वच सामन्यांमध्ये रविकुमारने चमकदार कामगिरी केली. दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारली. अंतिम फेरीत सुवर्णपदक हुकलं असलं तरी त्याने जिंकलेल्या रौप्यपदकालाही सुवर्ण झळाली आहे. देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधवांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये जिंकून दिले होते. तिथून सुरु झालेला देशाच्या वैयक्तिक ऑलिंपिक पदकांचा प्रवास आज रविकुमार दहियापर्यंत येऊन पोहोचला आहे. देशाच्या ऑलिंपिक पदकांचा प्रवास इथंच थांबणार नाही, यापुढे तो अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी रविकुमार दहिया आणि अन्य खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments to show.

Leave a Comment