युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी; 33% महिलांना संधी!

0
youth congress 2

मुंबई, दि. १२ जुलै २०२०

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले असून नवीन चेहऱ्यांना व महिलांना संधी देण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत प्रामुख्याने सामान्य घरातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून त्यापैकी 33 % जागांवर महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

मागील कार्यकारिणीतील ब्रिजकिशोर दत्त व शिवराज मोरे यांच्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर प्रदेश उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय सरचिटणीसपदी 9 जणांना पदोन्नती तर, 8 जणांची नवीन नियुक्ती केली असून 31 नवीन सेक्रेटरी घेतले आहेत. याखेरीज प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, विधी विभाग, रिसर्च डिपार्टमेंट, शिक्षण आणि विद्यापीठ विभाग, कामगार संघटन, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग, संपर्क व समन्वय,शिष्टाचार अशा विविध समित्यांवर नवीन नियुक्त्या व पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी युवती काँग्रेसची स्थापना हे या कार्यकारिणीचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवत आहे.

आ. ऋतुराज पाटील सरचिटणीस..

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास व प्रभारी हरपाल सिंह यांच्या मान्यतेने ही युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर केली.

सरचिटणीसपदी आमदार ऋतुराज पाटील, मधुकर नाईक, सोनालक्ष्मी घाग, नीरज लोणारे,  प्रेरणा वरपूडकर, अश्विनी आहेर, निखिल कांबळे, निखिल कवीश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा असल्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य चेहऱ्यांना आणि 33 % जागांवर महिलांना या कार्यकारीणीत संधी दिली असल्याचे सांगत हे पदाधिकारी त्यांच्या कार्याने पक्षाला बळकटी देतील असा विश्वास यावेळी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *