लोकांना अटक करणे, दंड ठोठावणे….हे भाजपा ठरवणार का?
भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही.
मुंबई दि. ३० जून :
भाजप ठरवणार… भाजप मागणी करणार… भाजपची लोकं निर्णय घेणार… भाजपची लोकं लोकांना अटक करणार… लोकांना दंड ठोठावणार… ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिहल्ला केला.
आम्ही बोलू तोच कायदा… आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
भाजपने देशात ज्याप्रकारची परिस्थिती म्हणजे भयाचे वातावरण निर्माण करायचं… लोकांवर राजकीय दबाव आणायचा परंतु त्यांचं बंगाल मॉडेल फेल ठरले आहे हे लक्षात ठेवावे असेही नवाब मलिक यांनी सुनावले आहे.
महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल करायची भाजपची इच्छा असेल तर करावी. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही हे लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
Leave a Comment