नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव !
नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव !
मुंबई, दि. २१ जून २१
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या वाद सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र या विमानतळाला शिवरायांचेच नाव असावे अशी भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे याविषयावर बोलताना म्हणाले की. ‘कोणतंही विमानतळ उभं राहताना शक्यतो शहराबाहेरची जागा निवडली जाते. तेव्हाच्या मुंबईच्या सीमेनुसार मुंबईतील विमानतळ सांताक्रूझला गेलं. कालांतरानं ते वाढत सहारपर्यंत गेलं. नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी होऊन स्थानिक ठिकाणांच्या नावानं ती विमानतळं ओळखली जाऊ लागली. आता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होतोय. त्यामुळे त्याला शिवरायांचंच नाव राहील असं मला वाटतं.
बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव योग्य वाटते. विमानतळाच्या नावाचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेला आहे की नाही माहीत नाही. पण आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतोय याचे भान आपल्याला असायला हवे. त्याला जे नाव आधी आहे, तेच नाव राहणार. ते तुम्ही कसे बदलणार,’ असा सवाल राज यांनी केला. ‘ असंही राज ठाकरे म्हणाले.
