Ads

--

औषधांच्या दुकानावर मंत्री राजेंद्र शिंगणेंनी स्वतःच टाकली धाड !

By Xtralarge News

July 11, 2020 12:21 pm

Ads

मुंबई, दि. ११ जुलै २०२०

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) व टॉसिलिझुमॅब (Tocilizumab) या औषधांचा काळाबाजार होत असून ही औषधे १० पटीने जास्त किमतीला विकली जात आहेत. रुग्णांच्या कुटुंबियांना लुटण्याचा धंदा सर्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची स्वतः औषध दुकानावर धाडी टाकल्या. या औषधांचा होत असलेला काळाबाजर रोखणार असे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

कोवीडच्या १०९ च्या औषधांच्या काळाबाजारीच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीत Remdesivir व Tocilizumab या औषधांचा काळाबाजार होत असल्यास अन्न व औषध प्रशासन अधिकारी व पोलिसांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पोलीस मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना पुरवठादाराने ज्यादा किंमत आकारल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 अथवा नजिकच्या कार्यालयास माहिती द्यावी असे मंत्री डॉ. शिंगणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या बैठकीला, सुबोध जैस्वाल, पोलीस महासंचालक, परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई, श्रीमती रश्मी शुक्ला, आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक(का व सु), संजय मुखर्जी, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सुनिल भारद्वाज, सहआयुक्त दक्षता आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment