बबड्या, राणादा-अंजलीबाई, संजू-रणजीत,..सगळं सगळं पुन्हा एकदा !!
मुंबई, दि. १० जुलै २०२०
कोरोना महामारीमुळे सगळे व्यवहारच नाहीतर एंटरटेनमेंटही बंदच पडले होते. मागील तीन महिन्यांपासून सिरीयल्सचे जुने एपिसोडच बघावे लागत होते. लॉकडाऊनमुळे शूटींगही बंद असल्यामुळे या सिरीयल्सचे नवे भाग पहायला मिळत नव्हते…पण आता ही प्रतिक्षा संपली असून तुमच्या लाडक्या मालिका १३ जुलैपासून पुन्हा टीव्हीवर येत आहेत.
‘अग्गंबाई, सासूबाई’ मधला वाया गेलेल्या ऐतखाऊ बबड्याचं काय होतं. त्याची आई आसावरी त्याला धडा शिकवते, का त्याची आईच बनवाबनवीला बळी पडते. शुभ्रा या बबड्या-सोहमला ताळावर आणते का, का पहिला पाढा ५५ राहतो, हे पाहायला तुम्ही उत्सुक असालच…तर राणादा व अंजलीबाई सुद्धा भेटायला येत आहेतच त्यापण १३ जुलैपासूनच…राणादा आता आणखी काय नवा डाव खेळतो…अंजलीबाईंचे काय होते. सगळं सगळं पुन्हा ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये पाहा..
कलर्सवरील ‘राजा राणीची गं जोडी’…या सिरियलमधील ढाले पाटलांच्या घरातील वाद, भाऊबंदकी वाढली का, संजू-रणजीत यांना घरातले कसे वागवतात. संजूची जाऊ तिचा पाणउतारा करतच राहते का…हेपण पुन्हा पहायला मिळणारय….भारीच हाय की !
स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका सुद्धा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता पुन्हा सुरु होत आहे. दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम…पण सौंदर्या इमानदार ही कार्तिकची आई काय घोळ घालते, त्यांचा प्लॅन यशस्वी होतो का…कहानी मे कोई ट्वीस्ट तो नही…!!!
सोनी मराठीवरील ‘हास्य जत्रा’, झीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ काम मिरवणार आणि कोणाची जिरवणार..हे सगळं सगळं पुन्हा सुरु होत आहे. कोरोनामुळे घरातच पडून रहावं लागत असल्याने आलेला शिण, बोअरपणा काही अंशी कमी होण्यास मदत होईलच त्यामुळे मराठी मालिका पाहण्यात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी तर या मालिकांमधून नक्कीच एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंट होईल अशी अपेक्षा..
