कुख्यात गुंड विकास दुबेचा खेळ खल्लास !! पण राजकीय वरदहस्त कोणाचा ?

0
dube 123

मुंबई, १० जुलै २०२०

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे हा आज शुक्रवारी सकाळी पोलिस एन्काऊंटमध्ये मारला गेला. हाच तो विकास दुबे ज्याची उत्तर प्रदेशात मोठी दहशत होती. ३ जुलै रोजी कानपूरमध्ये विकास दुबेला अटक करण्यासाठी  पोलीस गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडून हा नराधम आठ पोलिसांची हत्या करून पळाला. त्याला शोधण्यासाठी २०० पथकं तैनात करण्यात आली होती. शेवटी हा गुंड मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाली मंदिरात शरण आला होता..

हे सगळे एकदम फिल्मी स्टाईल झाले…दुबे शरण आला, पोलीस त्याला कानपूरला घेऊन निघाले असता पोलिस व्हॅन पलटली त्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलीसांच्या फाईरिंगमध्ये दुबेचा खेळ खल्लास…. दुबेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली…

पण या दुबेला आजपर्यंत कोणी पोसला, कोणाचा राजकीय वरदहस्त त्याच्यावर होता असे प्रश्न विचारले जात आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर तोफ डागली आहे, “गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच दुबेला उज्जैनमधून अटक झाल्यानंतरही प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर तोफ डागत..“कानपूरमध्ये पोलीसांची हत्या करुन आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचलाच कसा” अशी विचारणा केली होती.

तर “पोलिसांनी गाडी पलटली नाही तर दुबेने तोंड उघडले असते तर सरकार पलटले असते”, असे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *