हमालांची अन्यायकारक कंत्राटी पद्धत बंद करा !

0
NCP 22

मुंबई दि. १० जुलै २०२०

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचेपाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील अनेक भागात हमाल तोलाईदारांना काम नाकारणे व त्यांची मजुरी आणि लेव्ही माथाडी मंडळात जमा करण्यास नकार देणे आदी प्रकार सुरू असल्याकडे महामंडळाच्या प्रतिनिधींनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

या बैठकीमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना राज्यातील शासकीय गोदामातील हमालांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन या बैठकीत सादर करण्यात आले.

हमाल मापाडी कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगार विभागाने सक्रीय भूमिका घ्यावी याउद्देशाने त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीस हजेरी लावली.

हमाल मापाडी कामगारांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे तिन्ही विभागाच्या मंत्रिमहोदयांनी शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *