Ads

--

पेट्रोल व खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार !

By Xtralarge News

May 16, 2021 5:22 pm

Ads

पेट्रोल व खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार !

मुंबई दि. १६ मे :
पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत ७१५ ने वाढली आहे. डिएफए जी अगोदर ११८५ रुपये किंमत होती ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर आणखी बोजा वाढवला आहे, असे जयंत पाटील म्हणाले .

No comments to show.

Leave a Comment