Ads

--

उज्ज्वला गॅस, मोफत अन्नधान्य योजनांना मुदतवाढ !

By Xtralarge News

July 8, 2020 5:05 pm

Modi

Ads

नवी दिल्ली, दि . ८ जुलै २०२०

कोरोनाच्या संकटातून अजून जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही, लोकांच्या हातात पैसाच नाही त्यामुळे त्यांना आधाराची गरज आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्ने केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गरिब, कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

उज्ज्वला योजनाचा विस्तार करत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन मोफत सिलेंडरला आता सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. याचा लाभ देशभरातील ७ कोटी ४० लाख महिलांना होणार असून यासाठी खर्च १३ हजार ५०० कोटी रुपये येणार आहे.

प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेलाही नोव्हेंपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना राशन दिले जाणार आहे. देशातील गरिबांना मोफत रेशन देण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून या योजनेत मिळणाऱ्या इतर धान्यांसोबतच आता एक किलो चणेही देण्यात येणार आहेत.

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती दिली.

 

No comments to show.

Leave a Comment