Ads

--

महाजॉब्ज ! पहिल्याच दिवशी ८८ हजार नोकरीसाठी तर ७५० कंपन्यांची नोंदणी.

By Xtralarge News

July 8, 2020 11:59 am

Ads

मुंबई, दि. ८ जुलै २०२०

राज्यातील स्थानिक तरुण-तरुणींच्या रोजगारासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या महाजॉब्ज (MAHAJOBS) पोर्टलला प्रंचड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील इच्छुक उमेदवारांनी महाप्रतिसाद देत तब्बल ८० हजार उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली तर ७५० कंपन्यांनी योग्य उमेदवारांसाठी नोंदणी केली आहे.

रोजगार देणारे आणि मागणारे यांच्यात समन्वय साधून राज्य शासनाच्या विभागाच्या पुढाकाराने महाजॉब्ज पोर्टलचे अनावरण करण्यात आले. महाजॉब्ज प्रणालीच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी व योजनेच्या प्रभावी संचालनासाठी एमआयडीसीने एक कक्ष निर्माण करावा अशी सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

अधिवास प्रमाणपत्राची (Domicile certificate )अट असल्यामुळे या नोकऱ्या राज्यातील तरुणांनाच मिळतील. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या राज्यात गेल्यामुळे उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत त्यातच महाविकास आघाडी सरकारने १७ हजार कोटी रुपयांचे नवीन सामंजस्य करार केल्यामुळे नवीन रोजगाराच्या संधीही प्राप्त होत आहेत.

या संधीचा राज्यातील तरुणवर्गाने फायदा घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment