IMG-20210502-WA0019

पंढरपूरमधून भाजपाचे समाधान अवताडे विजयी..

पंढरपूर दि. 2 मे :

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 3733 मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अवताडेंनी पराभव केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच समाधान अवताडे यांनी आघाडी घेत कायम राखली.राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा राखता आली नाही.

भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण  1 लाख 09 हजार 450 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना एकूण 1 लाख 07 हजार 717 मते मिळाली.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीनेही ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील, पडलकर असे सर्वच नेत्यांनी येथे प्रचार केला. तर राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली.

समाधान अवताडे यांना आमदार प्रशांत परिचारक यांचा भक्कम पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे अवताडे यांचा विजय सोपा झाला. याआधीच्या निवडणुकीत परिचारक व अवताडे यांच्या मते विभागली जाऊन भालके यांना त्याचा फायदा होत असे परंतु या निवडणुकीत परिचारक यांनी अवताडे यांना पाठिंबा दिल्याने विजय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *