मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून काँग्रेस नाराज !

0
IMG-20210122-WA0058

मोफत लसीकरणाच्या श्रेयवादावरून काँग्रेस नाराज !

मुंबई, दि. २६ एप्रिल :
कोरोनावर लस हीच प्रभावी असून वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर मोफत लसीकरण मोहिम व्यापक प्रमाणात राबविणे हाच त्यावरचा उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुलजी यांनी कोरोना लस मोफत दिली पाहिजे अशी मागणी केली असून काँग्रेस पक्षीची ती भूमिका आहे असे स्पष्ट करून महाराष्ट्रातही सर्वांना सरसकट मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने केली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे ती म्हणजे लस ही मोफतच दिली पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने मागणी केलेली असताना मोफत लसींवरून श्रेयाची लढाई सुरू होणे हे योग्य नाही तसेच काँग्रेसला ते आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी कालच मोफत लस देणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने थोरात यांनी नाराज व्यक्त केली.

केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होईल याचे नियोजन केले पाहिजे. १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे, यापार्श्वभूमिवर धोरण ठरवण्याची गरज आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देताना सुरुवातीला गर्दी झाली, गोंधळ झाला. १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या पाहता निश्चित धोरण जाहीर केले नाही तर गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांबरोबर याविषयी आपली चर्चा झाली असून दोन दिवसात यासंदर्भात धोरण निश्चित होईल असेही थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *