केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस !

0
20201218_160115

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस !

नवी दिल्ली, दि. 19 एप्रिल:
देशभर सध्या कोरोना रुग्णांची प्रचंड वेगाने वाढणारी संख्या आणि मृत्यूचे आकडे ऐकून सगळीकडे विदारक चित्र पसरले आहे. त्यात बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही आणि दुसरीकडे लसींचा तुटवडा अशी अवस्था. केंद्र सरकारच्या कारभारावर जनतेतूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अशात आज केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन एक सुखद दिलासा दिला आहे.

आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस दिली जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. लस उत्पादकांनी ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असेही सांगण्यात आले आहे. आधी
फ्रंट वर्कर्स त्यानंतर जेष्ठ नागरिक आणि नंतर ४५ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोना चे विदारक चित्र व वयोमर्यादा कमी करण्याची मागणी लक्षात घेत आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. रशियन स्पुटनिक व्हीला या लसीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग येईल. देशात गेल्या ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे. तर देशात महाराष्ट्र हे लसीकरणात अग्रेसर आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *