पुण्यात 7 दिवस हाॅटेल, बार, शहर बस सेवा पूर्णपणे बंद !

0
20210402_171025

पुण्यात सात दिवस हाॅटेल, बार, शहर बस सेवा पूर्णपणे बंद !

पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी.

पुणे, दि. 2 एप्रिल:

कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने पुण्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहिल. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक आज पार पडल्यानंतर सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील राव यांनी वर्तवली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गवाढीचा वेग लक्षात घेत रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यासोबतच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना अत्यावश्यक उपचार मिळाले पाहिजेत, त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी मोठया प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र वाढवून चाचण्यामध्ये वाढ करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन पुरवठा, व्हँटीलेटर यांची संख्या वाढवून वाढवा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, त्याबाबतचे सर्व निकष पाळले जात असतील तरच परवानगी द्यावी, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *