पवारांच्या आजारावर विकृत लिखाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल.

0
IMG_20210401_161931

पवारांच्या आजारावर विकृत लिखाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल.

मुंबई दि. १ एप्रिल :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हीन दर्जाच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुंबई सायबर क्राईमकडे करण्यात आली होती. संबंधितांवर सायबर गुन्हयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाबद्दल समाजातील प्रत्येक घटकांतून काळजीचे सूर उमटले. समाजातील असा कोणताही घटक नसेल,ज्यांनी पवारांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत. परंतु काही विकृत मंडळींनी अतिशय हीन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या मरणाच्या आशा व्यक्त केल्या.

भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार करत गेली ५० वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या शरद पवार यांच्यावर केलेली टीका अतिशय जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडविण्याचे ठरवून सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी महेबूब शेख यांनी केली. त्यानुसार विकृत लिखाण करणार्‍यांवर पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४, ४६९,४९९, ५०७,३५, IT act ६६ (D) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो आणि आहोत मात्र यापुढे साहेबांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर अथवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प राहणार नाही असा स्पष्ट इशारा महेबूब शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *