तुम्ही केलेल्या आरोपाचा पुरावा काय?

0
20210331_154959

तुम्ही केलेल्या आरोपाचा पुरावा काय?

परमबीरसिंह यांना उच्च न्यायालयाने सुनावल .

 

मुंबई, दि. ३१ मार्च:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना मंबई उच्च न्यायालयाने खूप झापले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयकडून चौकशी करा अशी मागणी करणारी त्यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या सुनावणीवेळी कोर्टाने परमविर सिंह यांना चांगलेच फटकारले.

 

गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशी विचारणा हायकोर्टाने परमबीर सिंह यांना केली. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात. एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले.

 

गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का?  तुम्ही जे आरोप केलेत त्याचा पुरावा काय? तुम्ही केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित आहेत. स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे,’ असेही कोर्टाने खडसावले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *