मुलांच्या हातात मोबाईल देताय ?…. थांबा, आधी ही बातमी वाचा!

0
PUGB final

मुंबई. दि. ५ जुलै २०२०

मुलांच्या हातात स्मार्टफोन देणारे अनेक पालक आहेत. पण त्याचे दुष्परिणाम नंतर कळताच. त्यातच जी मुले पालकांची नजर चुकवून मोबाईवर गेम्स खेळतात त्यातून मोठे अनिष्टही ओढवू शकते.

अनेक मुले पालकांचा डोळा चुकवून मोबाईलवर गेम्स खेळतात, त्यातही पबजी (PUBG) खेळण्याकडे अनेक मुलांचा कल आहे. या पबजीने मुलांना एवढे वेड लावलेय की या गेमच्या नादात बळी घ्यायलाही ही मुले मागे पुढे पाहत नाहीत. काही मुलांनी या गेमच्या नादात पैशासाठी आई वडीलांचाही बळी घेतल्याचे आपण वाचले-ऐकले आहे. असाच एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन शाळा,क्लास,अभ्यास यासाठी पालक मुलांना मोबाईल देतात. पंजाबमध्ये असाच एक १७ वर्षांच्या मुलगा पालकांचा स्मार्टफोन अभ्यासासाठी घेऊन दिवसरात्र पबजी खेळायचा. खेळताना इनऍप्स अपग्रेड करायचा, मित्रांसाठीही तो अपग्रेड करायचा. पालकांच्या बँक खात्याची डिटेल्स त्याच्याकडे होतीच गुपचुप तो या खात्यातून ऑनलाईन अप्स खरेदी करायचा. यातून त्याने थोडे थोडके नाही तर तब्बल १६ लाख रुपय उडवले आणि वडिलाचे बँक खातेच रिकामे केले. वडलाला याची भनक लागू नये म्हणून हा पठ्ठ्या बँकेचे मेसेज डिलीट करुन टाकायचा. जेव्हा बँक स्टेटमेंट वडलाच्या हाती पडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जो पैसा मेहनत करुन जमा करुन ठेवला. आजारपणात उपयोगी पडेल,मुलाच्या भविष्यासाठी कामाला येईल म्हणून बचत केली होती, ती या नालायक कार्ट्याने पबजी गेमसाठी एका महिन्यातच उडवला.

शेवटी सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर वडिलांनी त्या मुलाना थेट गॅरेजमध्ये काम करण्यास पाठवले. पैसा कमावायला किती कष्ट पडतात त्याची त्या नालायक मुलाला किंमत कळावी आणि धडा शिकवावा म्हणून वडिलांनी हे पाऊल उचलले, पण त्याला फारच उशिर झाला होता.

आतातरी पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घ्यावी. अधूनमधून तो काय करतो त्यात लक्ष घालावे, नाहीतर अशीच दुर्दैवी वेळ आपल्यावरही यायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *