Ads

पगारासाठी पैसे नसताना मंत्र्यांना नव्या कार का?

By Xtralarge News

July 5, 2020 7:29 pm

Ads

मुंबई, दि. ५ जुलै २०२०

लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिकघडी अजून पूर्वपदावर आलेली नाही. राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची चणचण आहे. महिन्याचा पगार करताना सरकारच्या नाकीनाऊ येत आहे. काही विभागांतील कर्मचाऱ्यांना ५० टक्के पगार तर काहींची पगार कपात करण्याकडे सरकारचा कल आहे. सर्वबाजूंनी आर्थिक टंचाई असताना सरकारने मंत्र्यांच्या नव्या कार खरेदीसाठी मात्र मंजुरी दिली आहे.

सहा नव्या कोऱ्या इनोव्हा क्रिस्टा कार खरेदी करण्यासाठी अंदाजे १ कोटी ३७ लाख रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. या नव्या कार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, मंत्री सुनिल केदार, मंत्री आदिती तटकरे, अतिरिक्त मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग, क्रीडा विभाग आणि एक कार विभागातील अधिकारी यांच्यासाठी अशा सहा इनोव्हा क्रिस्टा घेतल्या जाणार आहेत. या एका कारची किंमत २३ लाखांपर्यंत आहे.

राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, एसटी कर्मचारी, यांनी सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. आमच्या पगारासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि मंत्र्यांच्या नव्या कोऱ्या कारसाठी पैसे आले कुठून, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment