मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !

0
IMG-20210325-WA0042

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !

मुंबई दि. २५ मार्च :
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘पवारसाहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अठरापगड जातींना घेऊन काम केले आणि करत आहेत. ही आपलेपणाची भावना राष्ट्रवादी काँग्रेस ठेवत आल्याने माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कोरोनाची महामारी आल्यानंतर महामारीत काळजी घ्या असे आवाहन केले होते आणि मालेगावच्या लोकांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.

आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, मालेगाव मधील सर्वांना आसिफ शेख यांनी विश्वासात घेऊन प्रवेश घेतला आहे. मालेगावमधील लोकांना पवार साहेबांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार आसिफ शेख, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, युसुफ अली, यासिन मोमिन, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *