Ads

-

‘ए भाई, तू जो कोणी असशील, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!

By Xtralarge News

March 23, 2021 4:26 pm

Ads

‘ए भाई, तू जो कोणी असशील. माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!

अमृता फडणवीसांची भाई जगताप यांना ट्विटरवरून दमबाजी..

मुंबई, दि. २३ मार्च :
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या नेहमीच आपल्या वादग्रस्त बोलण्याने चर्चेत असताता. आताही त्यांनी एक ट्विट करुन वाद ओढवून घेतला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना अमृतांनी ट्विट करत भाई जगताप यांचा ऐकरी उल्लेख केला.
या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘ए भाई, तू जो कोणी असशील. माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही यूटीआय व अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय,’

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असताना फडणवीसांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांच्या बँक खात्यावरून खोचक सवाल केला होता.

भाई जगताप म्हणाले होते, ‘सत्तेत असताना फडणवीसांनी राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती? फडणवीसांनी तब्बल २१ जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली होती. त्यांना काय बोलणार? त्यांचं डोकं ठिकाणावर नाहीए,’

जगताप यांच्या या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस यांचा तोल गेला आणि अगदी टपोरी भाषेत त्यांनी ट्विट केले. या ट्विटची दिवसभर चर्चा सुरु आहे.

 

No comments to show.

Leave a Comment